जळगाव (संपादक सुनिल पाटील) – सोमवार दि. ५ ऑक्टोबर २०२० रोजी ऑल इंडिया ऍक्ट अप्रेंटिस असोसिएशनच्या वतीने असोसिएशनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री भरत परदेशी यांनी जिल्हाधिकारी अभिजित राउत यांना रेल्वे अप्रेंटिसला पूर्वी प्रमाणे जीएम पावरने रेल्वे मध्ये सामावून घ्यावे व २१ जून २०१६ रोजी रेल्वे अप्रेंटिस ला दिलेला २०% आरक्षण चा नियम पूर्णपणे रद्द करावा आदी मागण्या निवेदनाद्वारे केल्या.
तसेच निवेदनात आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही देशव्यापी तीव्र आंदोलन करण्यास रस्त्यावर उतरू व यास पूर्णपणे रेल्वे मंत्री पियुष गोयल जबाबदार असतील असा इशारा दिला आहे. 
जिल्हाधिकारी यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत सांगितले की, मी आपल्या असोसिएशनच्या प्रमुख मागण्या मुख्यमंत्रींकडे व केंद्र सरकारपर्यंत पोहचविल. निवेदन देताना असोसिएशनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भरत परदेशी व असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.







