धरणगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी.पाटील) – महाराष्ट्रामध्ये सेना,राष्ट्रवादी,काँग्रेस व मित्रपक्षांची महाविकास आघाडीचे सरकार असून भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथरावजी खडसे साो यांनी सेना,राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस कोणत्याही पक्षात प्रवेश केल्यास शिवसेना त्यांचे स्वागतच करेल गेल्या अनेक दिवसापासून भाजपाचे माजी महसूल मंत्री यांच्या संदर्भात राजकीय बदल घडणार…नाथाभाऊ भाजपाला जय श्रीराम करणार अशा बातम्या प्रसिद्ध होत आहे.
बुलंद पोलिस टाइम्स चे जिल्हा प्रतिनिधी योगेश पी.पाटील यांनी त्यांची मुलाखत घेतली असता त्यांनी सांगितले नाथाभाऊ वर भाजपा मध्ये राहून जो अन्याय होत आहे त्यांना नेहमी डावलले जात आहे.
या विषयी त्यांनी गिरीश महाजन व माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर आरोप केल्यामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांनी मुंबई येथे जळगाव जिल्ह्यातील नेत्यांची बैठक घेऊन नाथाभाऊंच्या प्रवेशा विषयी चर्चा केली असता सर्व नेत्यांनी सांगितले पवार साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे त्यामुळे नाथाभाऊ राष्ट्रवादीत प्रवेश करतील असा तर्कवितर्क लावला जात आहे.
नाथाभाऊ कोणत्याही पक्षात गेले तर त्याच्या त्या पक्षाला निश्चित फायदा होईल शिवसेनेत जरी आले तरी आम्ही त्यांचे स्वागतच करू या संदर्भात लवकरच नाथाभाऊ निर्णय घेणार असल्याचे महाराष्ट्रात जोरदार चर्चा आहे.







