भुसावळमध्ये गुन्हेगारीची दहशत कायम; पुन्हा एका तरुणाचा खून

murder

भुसावळ (प्रतिनिधी गिरीश पवार) – गुन्हेगारीमुळे चर्चेत राहणार्‍या भुसावळमध्ये रात्री एका तरूणाच्या डोक्यात रॉड टाकून त्याची निर्घृण हत्या झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

 

 

 

भुसावळ शहर हे नेहमीच गुन्हेगारीमुळे चर्चेत असते. येथे गेल्या काही महिन्यांमध्ये सातत्याने गोळीबार, हत्या आणि गावठी कट्टे आढळण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. यात आता रविवारी रात्री अकराच्या सुमारास एका तरूणाची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे.

 

 

 

 

सूत्रांच्या माहितीनुसार पंचशील नगरात शेख कैफ शेख जाकीर या १७ वर्षाच्या तरूणाचा खून करण्यात आला. हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यात रॉड टाकल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र याआधीच त्याची प्राणज्योत मालवली. कैफच्या भावाशी झालेल्या वादातून हा भयंकर प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून पुढील तपास बाजारपेठ पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here