समन्वयकांनी दिली आर्थिक मदत
दोंडाईचा (संतोष कोळी) – येथील हमाली कामगार मराठा समाजाचा तरुण कै. मोहन मराठे यांच्या मृत्यू प्रकरणी धुळे जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्ठ मंडळाने तरुणांच्या घरी जाऊन कुटूंबियांनची भेट घेतली व दोषींवर कार्यवाही झाली पाहिजे चौकशी होईल तो पर्यंत अज्ञात दोषींवर 302 चा गुन्हा दाखल झाला पाहिजे. ही मागणी झाली असून परिवाराला आर्थिक मदत देण्यात आली.
नंतर तरुणाला न्याय मिळवण्यासाठी पुढची दिशा कशी असावी ह्यासाठी दोंडाईचा शासकीय विश्रामगृहात बैठक व पत्रकारांशी संवाद साधला. मराठा समाजाचे जेष्ट नेते आमदार विनायक मेटेजी, मा.आमदार रामकृष्ण पाटील जि.प सदस्य ज्ञानेश्वर भामरे, जिल्हाध्यक्ष मनोज मोरे,सचिव निंबा मराठे, मुन्ना शितोळे, वीरेंद्र मोरे,समाधान शेलार,आबा कदम,उल्हास यादव,दोंडाईचा येथील मा.नगरसेवक विजय मराठे,समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.




