बार्शी शहर तालुका काँग्रेस कमिटी प्रसारित महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आयोजित शेतकरी बचाव रैली

congress

सोलापूर (बार्शी विशेष प्रतिनिधी) – केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात आज देशभरातील शेतकरी, शेतमजूर आणि बाजार समित्यांच्या व्यवसायाशी निगडित लाखो छोटे व्यापारी, कामगार यांच्यामध्ये प्रचंड असंतोष आहे.
माननीय काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या मार्गदर्शनानुसार आणि खासदार राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशाचे नेते माजी केंद्रीय गृहमंत्री माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब, प्रदेश अध्यक्ष नामदार बाळासाहेब थोरात साहेब , सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रकाश बापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उपाध्यक्ष जुगकिशोर बापू तिवाडी यांच्या व राज्य कार्यकारिणी सदस्य सुधीर बापू गाढवे साहेब यांच्या उपस्थितीत देशभरामध्ये आज काँग्रेसचे होत असलेले आंदोलन बार्शी मध्ये हॉटेल रामकृष्ण एक्झिक्यूटिव्ह येथे हे पडद्यावर थेट प्रक्षेपित केले जाणार आहे

 

 

 

तसेच विविध स्मार्ट वेब चॅनल्स तथा केबल नेटवर्क तसेच सोशल मीडिया यावर प्रसारित केले जाणार आहे. याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या महामारी बाबतच्या सोशल डिस्टंसिंग चे तंतोतंत पालन करून केली जात आहेत. केंद्रातील भाजप सरकारने बहुमताचा गैरवापर करून, शेतकऱ्यांना विश्‍वासात न घेता पारीत केलेले हे कृषी कायदे तातडीने मागे घेतले पाहिजे, हीच मागणी आज देशाच्या कानाकोपऱ्यातून केली जात आहे.

 

 

 

याच मोहिमेचा एक भाग म्हणून प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने गुरुवार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4 वाजता विशाल राज्यव्यापी व्हर्च्युअल शेतकरी बचाव रॅलीचे आयोजन केले आहे. एकाच वेळी राज्यातील पाच वेगवेगळ्या विभागात होणाऱ आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here