जळगाव जिल्ह्यात ४८ हजार ११७ रुग्णांनी केली कोरोनावर मात

corona

आज आढळले ११९ कोरोनाबाधित; एकूण मृतांचा आकडा १ हजार २३५

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील कोरोना संशयित व्यक्तींच्या स्वॅब तपासणीचा अहवाल आल्यानंतर आज (दि.१५) शासकीय माहितीनुसार साडेसहा वाजता मिळालेल्या शासकीय अहवालानुसार ११९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

 

 

 

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात आज ११९ रूग्ण बाधित आढळून आले आहेत . यात जळगाव शहरातील ४१ आहेत. तालुकानिहाय बाधित रुग्णाची आकडेवारी याप्रमाणे जळगांव ग्रामिण ०२, भुसावळ ०६, अमळनेर ०४ , चोपडा ०३ ,पाचोरा ०६,भडगाव ०७, ,धरणगाव ०३, यावल १७, एरंडोल ०, जामनेर ०७, रावेर ०५ , पारोळा ०० ,चाळीसगांव १४ , मुक्ताईनगर ०२, बोदवड ०१,इतर जिल्ह्यातील ०१ असा कोरोनाबाधितांचा समावेश आहे.

 

 

 

जिल्ह्यात आज दिवसभरात २५५ रूग्ण उपचारात बरे होऊन घरी गेले . जिल्ह्यात आतापर्यंत उपचार घेऊन बरे होऊन सुखरूप घरी गेलेले रुग्णांची संख्या ४८ हजार ११७ झाली आहे . जिल्ह्यात सध्या २ हजार २१७ रूग्ण उपचार घेत असून आज दिवसभरात ११९ नवीन कोरोनाबाधित आढळल्याने एकूण बाधितांची संख्या ५१ हजार ५६९ झाली आहे .

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here