शिरपूर (प्रतिनिधी प्रशांत वाकडे (वरुळ)) – दि. 14/10/2020 रोजी शिरपूर शहर पोलीस स्टेशन अधिकारी व कर्मचारी यांना पेट्रोलिंग करत असतांना गुप्त बातमी मिळाली कि शिरपूर भागात वाघाडी टी पॉईंट जवळ एक पिवळ्या रंगाचा शर्ट घातलेला इसम हा विना परवाना बेकायदेशीर गावठी कट्टा घेऊन वाघाडी गावाकडून शिरपूर कडे पायी जात असतांना खाली नमूद पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी सापडा रचून अत्यंत शिताफीने नमूद इसमास पकडले.
त्याच्या ताब्यात असलेला एक 15000/- रुपये किमतीचा देशी बनावटीचा लोखंडी कट्टा व एक जिवंत काडतूस आरोपी नामे योगेश विजय शिंपी राहणार इंदिरा नगर शिंगावे शिवार ता. शिरपूर जि. धुळे याच्याकडून हस्तगत करण्यात आला. त्याबाबत शिरपूर शहर पोलीस स्टेशन ला भारतीय शस्त्र अधिनियम 1959चे कलम 3,25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस महा संचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या आदेशान्वये दि. 5/10/2020 रोजी पासून ते 15/10/2020 या कालावधीत बेकायदेशीर शस्त्र बाळगणारे व विक्री करणारे विरोधात विशेष मोहीम राबविणे पोलीस अधीक्षक धुळे यांचेकडील 290/स्थागुशा/ अवैध शस्त्र जप्ती मोहीम 4588/2020 अन्वये चिन्मय पंडित पोलीस अधीक्षक धुळे, प्रशांत बच्छाव अप्पर पोलीस अधीक्षक धुळे, अनिल माने, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपूर विभाग शिरपूर व हेमंत पाटील पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन शिरपूर यांचे मार्गदर्शक सूचनांप्रमाणे सदरची कारवाई शोध पथकाचे कर्मचारी परी,पोसई/ संदीप मुरकुटे, पोलीस कॉन्स्टेबल योगेश कोळी, बापूजी पाटील, नरेंद्र शिंदे, स्वप्नील बांगर, अमित रनमळे, प्रवीण गोसावी, मुजाहिद शेख यांनी केली आहे.







