धरणगांव (उपसंपादक प्रा पी एम पाटील) – केंद्र सरकारनें शेतकऱ्यांवर लादलेल्या जुलमी कायद्यांना रोखण्यासाठीं धरणगाव तालुका काँग्रेस कडून शेतकरी बिलाच्या विरोधात आज दुसऱ्या दिवसाचे स्वाक्षरी मोहिमीचे उदघाट्न अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील तसेच धरणगाव नगरीचे नगराध्यक्ष निलेश चौधरी, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, राष्ट्रवादीचे नेते ज्ञानेश्वर महाजन,राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक वाघमारे, शहर अध्यक्ष निलेश चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी प्रदेश काँग्रेस सचिव डी. जी.पाटील,तालुकाध्यक्ष मा. रतिलाल चौधरी, जिल्हा सरचिटणीस सम्राट परिहार, शहराध्यक्ष राजेंद्र न्हायदे,ज्येष्ठ नेते सुरेश भागवत,एरंडोलचे उपनगराध्यक्ष योगेश महाजन, तालुका उपाध्यक्ष चंदन पाटील,सरचिटणीस रामचंद्र माळी,विकास लांबोळे, अमोल हरपे,गोपाल पाटील,नंदा महाजन, युवक अध्यक्ष गौरव चव्हाण, युवक उपाध्यक्ष राहुल मराठे, योगेश येवले,रवि महाजन, सुनील बिरले,चंदू लांबोळे इत्यादी कार्यकर्ते व शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.








