डॉ स्वप्नील कोळंबे यांना खंडणी मगितल्याप्रकरणातील आरोपीस अटक

bhusawal-crime

भुसावळ (प्रतिनिधी गिरीश पवार) – शहरातील जामनेररोडवरील कोळंबे हॉस्पिटलचे डॉक्टर व स्टॉफ यांना दीनदयालनगरमधील चार इसमांनी चाकूचा धाक दाखवून खंडणी मागून जिवे मारण्याची धमकी दिल्याने भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

फिर्यादी डॉ.स्वनिल कोळंबे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दि 12 रोजी रात्री 7.55 वाजेपासून ते 21रोजीचे रात्री 8.00 वाजेच्या दरम्यान जामनेर रोडवरील कोळंबे हॉस्पिटल येथे कलिम शेख (रा- दीनदयाल नगर),संदीप (पूर्ण नाव माहीत नाही) व त्यांचे इतर दोन अनोळखी साथीदारांनी हॉस्पिटलमध्ये येऊन फिर्यादी व स्टॉफला चाकूचा धाक दाखवून 50 हजार प्रति महिना खंडणी मागून फिर्यादिस शिवीगाळ करून खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

 

फिर्यादीच्या हॉस्पिटल मधील फोनवर फोन करून तुमको हॉस्पिटल चालना है की नही कलीम शेख बात कर रहा हू.तुमको मुझे हर महिना 50 हजार रुपये देणे पडेगे नाही तो तुमको जाण से मार डालुंगा अशी धमकी दिली म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक यांच्या आदेशानुसार दि 22 रोजी बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुरुन 901/2020 भा.द.वि.कलम 387, 504, 506, 507, 34, 3, 25, 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि मंगेश गोटला करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here