अश्लील व्हिडिओ दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

rape

नाशिकरोड (प्रतिनिधी) – आपला स्वभाव सुधारण्यासाठी नातेवाईकांकडे राहण्यास आलेल्या तरुणाने अल्पवयीन मुलीला अश्लील व्हिडीओ दाखवून तिच्यावर अतिप्रसंग केल्याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.

 

जेलरोड-कॅनलरोडवरील तरुण शुभम साहेबराव शेवाळे (वय २४) याचे ऑगस्टमध्ये परिसरात भांडण झाले होते. शुभमचा स्वभाव सुधारावा म्हणून घरच्यांनी त्याला जयभवानी रोडवरील नातेवाईकांच्या घरी राहण्यास पाठविले होते. सहा ते २८ ऑगस्ट दरम्यान शुभमने नातेवाईकाच्या घरातील अल्पवयीन मुलीला मोबाइलमध्ये अश्लील व्हिडीओ दाखवून तिच्यावर अतिप्रसंग तसेच अनैसर्गिक कृत्य केले.

 

मुलीच्या आईला मोबाइल व्हाट्सअप चॅटिंगवरून ही बाब लक्षात आली. तिच्या तक्रारीवरुन शुभम शेवाळेविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here