दोंडाईच्यात श्री स्वराज्य हित प्रतिष्ठान संघटनेचे फलक अनावरण

dondaicha

दोंडाईचा- (संतोष कोळी) – दोंडाईचा येथील येथे दि. 25 रोजी श्री स्वराज्य हित प्रतिष्ठानचे फलकाचे अनावरण चा कार्यक्रम सकाळी दहा वाजेला प्रमुख अतिथीचा हस्ते स्टेशन भागातील निर्मल एम्पोरियम जवळ संपन्न झाला.

 

काल विजयादशमीच्या औचित्य साधून शहरातील गोरगरीब व दीनदुबळ्यांसाठी सामाजिक संघटना असणे खूप महत्त्वाचं असल्याने लक्षात घेऊन शहरात श्री स्वराज्य हित प्रतिष्ठान संघटनेची स्थापन करुन फलकाचे अनावर तोंडाच्या शहर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक देविदास पाटील यांच्या हस्ते फलक अनावरण करण्यात आले.

 

या कार्यक्रमाला दोंडाईचा शहर चे हस्ती बँकेचे चेअरमन कैलास जैन, पोलीस उपनिरीक्षक देविदास पाटील, अँड. जगदीश कुवर, डॉ. हेमंत नागरे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हस्ती बँकेचे चेरमन कैलास जैन सहकार्य लाभले होते. याप्रसंगी आरोग्य सभापती प्रतिनिधी जितेंद्र गिरासे, नगरसेवक हितेंद्र महाले, माजी नगरसेवक विजु मराठे, डॉ. हमेंत नागरे, अँड. जगदीश कुवर, डॉ. राजू पाटील, डॉ. जयेश ठाकूर, नाभिक समाज तालुका उपाध्यक्ष रविंद्र चित्ते, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष राकेश चित्ते, उपाध्यक्ष नागेश्वर ठाकूर, सचिव कुणाल कांगणे, सदस्य पवन तेले, अक्षय गिरासे, ऋषिकेश ठाकूर, संदीप पवार, कल्पेश ठाकुर, जगदीश ईशी, मुकेश चित्ते, अनिल पवार, मनोज पाटील इत्यादींनी मेहनत घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here