अल्पवयीन मुलीस पळवुन नेणाऱ्या आरोपीतास १२ तासात केले गजाआड

thane-police

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – दिनांक २३/१०/२०२० रोजी फिर्यादी यांची मुलगी वय १६ वर्षे ही खैरणे तलाव येथे जाऊन ती घरी परत न आल्याने फिर्यादी यांनी तिचा सर्वत्र शोध घेतला ती कुठेही मिळुन आली नाही म्हणुन फिर्यादी यांच्या मुलीस कुणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादीचे रखवालीतुन फिर्यादीचे संमतीशीवाय अपनयन केले म्हणुन पोलीस ठाणे येथे तात्काळ गुन्हा नोंद क्र. २४६/२०२० कलम ३६३ भादवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला

 

सदर प्रकरण हे गंभीर स्वरूपाचं असल्याने सदर प्रकरणात मा सह पोलीस आयुक्त, पोलीस उप आयुक्त परी १ सहायक पोलीस आयुक्त वाशी विभाग यांनी आरोपीचे शोध घेण्यासाठी मार्गदर्शन केले. त्या प्रमाणे गुन्हयाचे गांभीर्य ओळखुन कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे पोनि विश्वकार व सपोनि प्रविण पांडे, सपोनि वसीम शेख, मसपोनि कविता सुतार] पोउपनि मनोज महाडिक, पोउपनि सागर धुमाळ सपोनि वसीम शेख व पोउपनि मनोज महाडीक, व पोलीस पथकास असे तपास पथक तयार केले.thane

 

घटनास्थळी आजूबाजूचे लोकांकडे चौकशी केली त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, तांत्रिक तपास गोपनिय सुत्र या चेकडून माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. पथकाने मानखुर्द, मुंबई याठिकाणी कसोशीने शोध घेतला. पथकाला शोध घेत असतानाच आरोपी हा मोटार सायकलने अपहत मुलगी वेगाने घेवुन जाताना दिसून आला, पथकाने आरोपीत याचा पाठलाग करुन त्यास इंदिरा नगर, मानखुर्द, मुंबई याठिकाणी मोटार सायकल व अपहत मुलगी हिच्यासह ताब्यात घेतले. गुन्हयाचा कौशल्यपुर्ण तपास करून अवघ्या १२ तासात आगीपीस अटक केले. आरोपीची माहिती सुनिल अंगद राजभर, वय २१ वर्षे, रा. रुम न. इम्तियाज चाळ, सेक्टर १२, कोपरखैरणे गांव, नवी मुंबई

 

वरील गुन्हा हा संवेदनशील असल्यामुळे कोपरखैरणे पोलीस ठाण्याने १२ तासाचे आत आरोपीतास अटक करुन अल्पवयीन मुलीची सुटका केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here