लोणावळा शहर माजी शिवसेना प्रमुखाची गोळ्या झाडून हत्या

lonawala-shivsena

पुणे (प्रतिनिधी अविनाश मुंडे) – लोणावळा शहराचे माजी शहर प्रमुख राहुल शेट्टी भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात अशा दोन हत्या झाल्याने लोणावळा शहर हादरले आहे.

 

लोणावळा शहरातील जयचंद चौक येथे ही घटना घडली. राहुल उमेश शेट्टी असे खून झालेल्या शिवसेनेच्या माजी शहर प्रमुखाचे नाव आहे. दरम्यान,हनुमान टेकडी येथे गणेश नायडू नावाच्या व्यक्तीचाही डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून रात्री साडेनऊच्या सुमारास खून करण्यात आला होता. या प्रकरणी एकाला लोणावळा पोलिसांनी ताब्यात घेतले असून शेट्टी खून प्रकरणी अज्ञात आरोपी हे फरार आहेत.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळा शिवसेनेचे माजी शहर प्रमुख राहुल उमेश शेट्टी यांची दोघा अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. ही घटना लोणावळा शहरात घडली असून राहुल शेट्टी हे घराजवळील हॉटेलमध्ये चहा पीत बसले असताना अचानक दुचाकीवरून आलेल्या दोघांनी जवळून तीन गोळ्या झाडल्या यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here