शहाजहाँपूरमध्ये ७ वर्षीय मुलीवर बलात्कार

Rape of sister-in-law

शहाजहाँपूर – उत्तर प्रदेशातील शहाजहाँपूरमध्ये घराबाहेर खेळत असलेल्या सात वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. आरोपी अल्पवयीन असल्याचे सांगितले जात असून, त्याला ताब्यात घेतले आहे. जखमी अवस्थेत मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, खुदागंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली. गुरुवारी संध्याकाळी एका सात वर्षांची मुलगी आपल्या मित्रांसोबत घराजवळ काही अंतरावर खेळत होती. गावातील एका अल्पवयीन मुलाने मुलीला शेतात नेले. तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. मुलीने आरडाओरड केल्यानंतर हा मुलगा घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. जखमी मुलीला रुग्णालयात नेण्यात आले.

 

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली. पोलिसांनी एफआयआर दाखल करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here