शिंदखेडा तालुक्यातील शिक्षक यशवंत निकवाडे यांनी नाथाभाऊंना सप्रेम भेट दिले स्केच

nathabhau-sktch

दोंडाईचा (प्रतिनिधी संतोष कोळी) – येथील यशवंत निकवाडे  हे  धुळे जिल्ह्य़ातील शिंदखेडा तालुक्यातील वर्शी ह्या लहानशा गावाचे रहिवासी आहेत. ते गावातच  शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.त्यांनी राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांचे चित्र करून त्यांना सप्रेम भेट देताना यशवंत निकुळे चित्रकार व त्यांचे सहकारी यावेळी उपस्थित होते

 

यशवंत निकवाडे शिंदखेडा तालुक्यातील वर्षी येथील रहिवासी आहेत त्यांना लहानपणापासूनच चित्र  काढण्याची खूप आवड होती.हि कला त्यांनी आजपावेतो जोपासली.या कोरोनाकाळामध्ये त्यांनी शेकडो चित्रे काढली.पण ह्या सर्व स्केचेस मध्ये त्यांनी  आपल्या कल्पकतेतून काढलेली सुंदर स्केचेस  लोकांना चांगलीच पसंद आली त्यांच्या ह्या स्केचेसने सर्वांचे मनमोहून घेतले.चित्र अभिव्यक्तीचा माध्यमातून त्यांनी जनजागृती करण्याचा एक स्तुत्य उपक्रम राबविला असून त्याला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे .

 

ते कवी,लेखक, शिक्षक, निवेदक म्हणून सर्वांना ज्ञात आहेत. पण त्यांची ही कला पाहून सर्वचजण आश्चर्य व्यक्त करतात.त्यांनी काढलेल्या स्केचेसला सर्वच स्तरातून चांगला प्रतिसाद मिळत असून त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here