दोंडाईचा येथे महर्षि वाल्मिकी ऋषींच्या जयंतीनिमित्त अ.भा.युवा कोळी समाजाच्यावतीने प्रतिमा पूजन

dondaicha-walmiki

दोंडाईचा (प्रतिनिधी संतोष कोळी) – येथील अखिल भारतीय युवा कोळी कोरी, समाज धुळे जिल्हा च्या वतीने प्रभू श्रीरामायणाचे शिल्पकार आद्यकवी, महर्षी वाल्मिक ऋषी यांची जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली, अखिल भारतीय युवा कोळी समाज दिल्ली शाखा महाराष्ट्र अंतर्गत धुळे जिल्हा शाखेचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन धुळे जिल्हा निरीक्षक रवींद्र शामराव देवरे यांच्या हस्ते करण्यात आले तर महर्षी वाल्मिक ऋषी चे प्रतिमापूजन दोंडाईचा वरवडे नगरपालिकेचे नगरसेवक नरेंद्र भाऊसाहेब कोळी यांच्या हस्ते करण्यात आले.

 

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी धुळे जिल्हा अध्यक्ष पत्रकार संतोष कोळी हे होत याप्रसंगी संतोष कोळी यांनी महर्षी वाल्मिक ऋषी यांची आत्मकथा आणि कोळी समाज बांधवांना समाज प्रबोधन विषयी थोडक्यात माहिती दिली त्याचबरोबर महिला व पुरुष बचत गटाची स्थापना झाल्याचे माहिती कोळी समाज बांधवांना याप्रसंगी दिली dondaicha

 

यावेळी नगरसेवक नरेंद्र कोळी ,शिवसेनेचे उपशहर प्रमुख आकाश दादा कोळी जिल्हा संघटक अनिल जाधव ,जिल्हा कार्याध्यक्ष विनोद कोळी जिल्हा संपर्कप्रमुख छोटू भाऊ सैंदाणे ,तालुका उपाध्यक्ष चेतन शिरसाट अध्यक्ष शिंदखेडा ग्रामीण,चे योगेश कोळी वरझडी ज्ञानेश्वर कोळी महारु कोळी शहराध्यक्ष मयुर कोळी सागर कोळी विकी कोळी या युवा आघाडीचे महेंद्र कोळी ,दोंडाईचा शहर व‌ परिसरातील कोळी समाज बांधव सोशल डिस्टिक चे पालन करून उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here