सुप्यात तरुणीवर अत्याचार; एकास अटक चार फरार

rape

अहमदनगर (विशेष प्रतिनिधी) – येथील उच्च शिक्षण घेत असलेल्या मागासवर्गीय तरुणीस लग्नाचे अमिष दाखवून तिला गुंगीचे औषध टाकलेली बियर पाजून वारंवार अत्याचार करणार्‍या नराधामास व त्याला साथ देणार्‍या चौघांविरुध्द सुपा पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी शुभम चव्हाण यास अटक करण्यात आली असून साथ देणार्‍या सुप्यातील स्वप्निल घुले याच्यासह अंकुश मगर, पप्पू पवार, विकास पोटे हे चौघे फरार झाले आहेत.

 

महाविद्यालयीन तरुणीचे गावातील शुभम चव्हाण या तरुणाशी प्रेमसंबंध होते. दोघांच्या प्रेमसंबंधाची त्यांच्या घराच्या लोकांना माहिती झाल्यावर 2 जुलै 2020 रोजी सुपे पोलीस ठाण्यात दोन्ही कुटुंबातील सदस्य गेले. तेथेही शुभम चव्हाण याने माझे पीडित तरुणीशी प्रेमसंबंध असून आम्ही दोघे लग्न करणार असल्याचे सांगितले. पोलीस अधिकार्‍यांसमक्ष तसे लेखी दिल्यानंतर त्याच दिवशी शुभम पीडितेस कारेगाव (ता. शिरुर, जिल्हा पुणे) येथे घेऊन गेला त्याचे मित्र विकास पोटे व अंकुश मगर यांनी कारेगाव येथे खोली घेऊन देण्यास मदत केली.

 

कारेगाव येथे गेल्यावर आरोपी शुभम हा पीडितेस दररोज मोलमजुरी करण्यासाठी पाठवित होता. रात्रीच्यावेळी तो रोज दारू पिऊन पीडितेस मारहाण करीत असे. बियरमध्ये गुंगीचे औषध टाकून ते पिण्यास भाग पाडीत, तसेच बळजबरीने सिगारेट पिण्यास लावत.कारेगाव येथे कॉलनीत मारहाणीचा आवाज जाऊ नये म्हणून बाथरुमध्ये नेऊन मारहाण करीत.
मला तुझ्या बरोबर रहायचे नाही, तू मला सोडून दे, तू जीव दिला तर मी अडचणीत येईल, असे सांगत मारहाण करीत होता. शुभमची आई तसेच चुलतीनेही याच कारणावरून आपणास मारहाण केल्याचे पीडित तरुणी सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या व्हिडीओमध्ये सांगत आहे.

 

याबाबत सुपे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीमध्ये दि. 2 जुलै 2020 ते 29 ऑक्टोबर 2020 दरम्यान आरोपी शुभम चव्हाण याने फिर्यादी ही मागासवर्गीय आहे. हे माहित असतानाही तिला लग्नाचे अमिष दाखवून, अत्याचार करून, फिर्यादीस शिविगाळ दमदाटी करून, तिला गोळ्या देऊन लग्नाला नकार दिला.
तुझ्या घरच्याना मारील, अशी धमकी दिली. यावरून अंकुश मगर, पप्पू पवार, स्वप्नील घुले, विकास पोटे (सर्व रा. सुपे) यांच्याविरुद्ध भा.दं.वि, कलम 376 328 323 504 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपींपैकी शुभम चव्हाण यास शनिवारी सायंकाळी अटक करण्यात आली असून इतर चार आरोपी फरार आहेत.

 

पीडितेने तिच्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल करून दिली आहे. या व्हिडीओमध्ये नराधमांसह त्यास मदत करणारांच्या नावाचा उल्लेख असून या व्हिडीओमुळे सुप्यात एकच खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here