मुंबईजवळील नालासोपाऱ्यात दीड कोटींचे कोकेन जप्त

arrest

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – नालासोपाऱ्यात तुळिंज पोलिसांनी कारवाई करून ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला. नालासोपारा येथून चार नायजेरियन नागरिकांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ७४७ ग्रॅम कोकेन हस्तगत केले आहे. त्याची किंमत अंदाजे १.४९ कोटी रुपये आहे.

 

अगु ओसिटा (वय २८), उर्जी फिलिप्स (वय ३०) आणि ओगोना चुकवेने (वय २९) आणि क्रिस अजाह चुकवेनेका (वय ३०) अशी अटक केलेल्या नायजेरियन नागरिकांची नावे आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, नालासोपारा पूर्वेकडील प्रगती नगरमध्ये काही नायजेरियन नागरिक कोकेन विक्रीसाठी येत असल्याची माहिती खबऱ्यांकडून मिळाली होती.

 

त्यानुसार, पोलिसांची दोन पथके स्थापन केली. त्यानंतर त्यांनी आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला. पोलिसांना चार नायजेरियनच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. पोलिसांनी त्यांना अटक केली आणि त्यांच्याकडून ड्रग्ज जप्त केले. या प्रकरणी तुळिंज पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here