करोना वायरसच्या पार्श्वभुमीवर खबरदारी म्हणून यंदा साध्या व वेगळ्या पद्धतीने साजरी….
दोंडाईचा (प्रतिनिधी संतोष कोळी) – करोना विषाणूसारख्या गंभीर उद्भवलेल्या आजाराच्या पाश्वभुमीवर खबरदारी म्हणून समस्त शहर व परिसरातील कोळी समाज बांधवातर्फ व यंदाची महर्षी वाल्मीकी महाराज ऊत्सव समिती तर्फे गावात, चौका-चौकात गर्दी न करता .अत्यंत साध्या पद्धतीने महर्षी वाल्मिकी ऋषींची प्रतिमा पुजन घरोघरी ठेवत मोठ्या आंनदात उत्सव समितीकडून हा कार्यक्रम नियोजित यशस्वी करण्यात आला.
दिनांक ३१आँक्टोबंर रोजी उत्सव समितीकडून समाजातील सर्व माता, भगिनी, बंधुना आवाहन करत,शासनाचे कोवीळ-१९ चे नियम दर्शवत,यंदाची परिस्थिती पाहत जयंती साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आदेशित ठरविण्यात आले होते. त्या पाश्वभुमीवर ऊत्सव समितीने मागील वर्षी ज्या समाज बांधवांनी जयंती साजरा करण्याकरिता देणगी दिली होती. त्यांना ह्या वर्षी घरोघरी जावून महर्षी वाल्मिकी ऋषी यांची प्रतिकात्मक फोटो प्रतिमा भेट म्हणून जवळपास ऐंशी कुटुंब प्रमुखांनपर्यंत प्रत्यक्ष भेटीत देण्यात आली. तसेच समाज बांधव व तरूण मंडळींचा उत्साह पाहता,कुठेही अधिक गर्दी न जमवता .गावातील विविध ठिकाणी फलक अनावरण कार्यक्रम घेण्यात आला. त्यात (१)जुना कोळीवाडा,(२)राऊळनगर सालदारवाडी,(३)महादेवपुरा,(४)म्हाळसानगर,(५)पाण्याची टाँकी महादेवपुरा,(६)भगवा चौक,(७) डाबरी घरकुल,(८)बन्सी पुढारी यांच्या घरापुढे आदी ठिकाणी मोठया दिमाखात, ऊत्साह पुर्ण वातावरणात वेगळ्या पद्धतीने जयंती साजरा करत ,दिवसभर फलक अनावरण कार्यक्रम पार पाडण्यात आला.
यावेळी दिवसभर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ऊत्सव समितीचे अध्यक्ष श्री विकी कोळी, उपाध्यक्ष श्री महेंद्र बाबा डाँटकाँम कोळी,खजीनदार श्री मयुर सोनवणे, सचीव श्री प्रकाशमास्तर सोनवणे, सदस्य श्री बन्टी कोळी, श्री आप्पा कोळी,श्री मचकेश कोळी,श्री विनोद कोळी,श्री विशाल मगरे,श्री संजय मगरे, श्री राजधर कोळी,श्री सबलू कुँवर,श्री चेतन सदाराव,श्री रोशन कोळी,श्री बबलू कोळी,श्री हिरालाल कोळी,श्री जितू कोळी,श्री आकाश कोळी,श्री गणेश कोळी,श्री हरिष कोळी,श्री सतीष कोळी, श्री ईश्वर कोळी, श्री राहुल कोळी, श्री मुकेश कोळी, श्री मयुर कोळी,श्री सोनू कोळी,श्री सोनू ठाकरे,श्री तुषार कोळी,श्री लोकेश कोळी,श्री संदीप कोळी,श्री भुषण कोळी,श्री संभाजी कोळी, श्री किरण साळवे,श्री सचिन कोळी आदींनी अपार मेहनत घेतली.
सदर कार्यक्रमास शिवसेना जिल्हाप्रमुख श्री शानाभाऊ सोनवणे, धुळे-नंदुरबार आखिल भारतीय कोळी समाज उपाध्यक्ष श्री मनोज सोनवणे, आदिवासी वाल्मीकलव्य प्रमुख श्री वसंत बापू कोळी, नगरसेवक श्री नरेन्द्र कोळी, कार्योध्यक्ष श्री मनोज निकम,श्री नितीन सदाराव,श्री मोहन कोळी आदी ज्येष्ठ लोकांचे मार्गदर्शन लाभले.





