उत्तरप्रदेश पोलिसांमधील माणुसकी : पोलीस अधीक्षकांनी विकत घेतले वृध्द महिलेचे सर्व दिवे

up-police

मिर्झापूर (उत्तरप्रदेश) – उत्तर प्रदेशच्या पोलिस आपल्या कठोर आणि क्रूर व्यवहारासाठी ओळखले जातात असे म्हटले जाते. मात्र शुक्रवारी मिर्झापूरमध्ये एका पोलिस अधिकाऱ्याच्या वेगळ्याच रुपाचे दर्शन घडले. हे रुप अतिशय छान आणि आशादायी असे आहे. पोलिस अधिकारी गस्त घालण्यासाठी निघाले होते. त्यावेळी एका रस्त्याच्या कडेला एक वृद्ध महिला आपल्या निरासग मुलाला घेऊन दिवे विकायला बसली होती. ही महिला सकाळपासून दिवे विकण्यासाठी बसली होती, मात्र तिच्या दिव्यांची विक्रीच झाली नाही हे पोलिस अधिकाऱ्याला समजले.

 

गस्त घालत असताना पोलिस अधिक्षक संजय वर्मा यांनी रात्री १० वाजता रस्त्याच्या कडेला एक वृद्ध महिला आपल्या निरागस मुलांसह मातीचे दिवे विकण्यासाठी बसलेली पाहिली. ते तिच्याजवळ गेले. रात्र झाली तरी देखील या वृद्ध महिलेचे दिवे विकले गेले नसल्याचे त्यांना माहीत पडले. हे ऐकून वर्मा यांचे मन हेलावले. त्यांनी त्या वृद्ध महिलेकडून सर्वच्या सर्व दिवे खरेदी केले. इतकेच नाही, तर रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या लोकांमध्ये ते वाटून देखील टाकले.

 

त्यातील काही दिवे त्यांनी आपल्या सोबत असलेल्या शिपायांमध्ये देखील वाटले. उरलेले दिवे ते आपल्या घरी घेऊन गेले. यामुळे कमीतकमी त्यांच्या चेहऱ्यावर मी एक समाधान पाहू शकलो असे वर्मा म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here