नवी दिल्ली – भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअरस्ट्राईक केली आहे. यात अनेक दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळावर एअरस्ट्राईक केली आहे.
पाकिस्तान नेहमी दुप्पटी व्यवहार करत आला आहे. एकिकडे पाकिस्तान एफएएफटीच्या ग्रे लिस्टमधून बाहेर पडण्यासाठी दहशतवाद्यांवर कारवाई करत आहे. तर दुसरीकडे भारतात दहशतवाद्यांचे समर्थन करत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी सिमेवरून घुसखोरी करण्याच्या प्रयत्न केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.
बालाकोट येथील पाकिस्तानी दहशतवादी तळांवर भारतीय हवाई दलाने २६ फेब्रुवारी २०१९ ला रात्री हल्ला केला होता. या हवाई हल्ल्यामध्ये २०० पाकिस्तानी दहशतवादी आणि अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्थ झाल्याचा दावा भारताने केला होता. मात्र, पाकिस्तानने हा दावा फेटाळला होता. या घटनेनंतर दोन्ही देशामध्ये तणाव वाढून हवाई चकमकही झाली होती. तसेच दोन्ही देश युद्धजन्य परिस्थितीला सामोरे गेले होते.
बालाकोट एअर स्ट्राईकनंतर कोणताही मोठा दहशतवादी हल्ला झाला नाही. अनेक निवडणुका झाल्या मात्र, भारतावर हल्ला झाला नाही. जर दहशतवादी हल्ला केला तर भारतीय लष्कर पुन्हा आपल्यावर कारवाई करेल या भीतीने दहशतवाद्यांनी हल्ला केला नाही, असे माजी हवाई दल प्रमुख बी. एस. धानोवा म्हणाले होते.
पाकिस्तानमध्ये घुसून भारत दहशतवादी तळांवर हल्ला करेल, असे त्यांना वाटत नव्हते. मात्र, भारताच्या कारवाईमुळे वैचारिक आणि काम करण्याच्या पद्धतीमध्ये बदल झाल्याचे दिसत आहे. बालाकोट हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झाले आहे, मागे वळून पाहिल्यावर समाधानी वाटते. यातून आपल्याला खूप शिकायला मिळाले. तसेच बालाकोट नंतर अनेक नव्या योजना अमलात आणण्यात आल्या आहेत, असे धानोवा म्हणाले.







