दोडाईचा (विशेष प्रतिनिधी) – नोव्हल कोरोणा 19 विषाणु याला प्रतिकार करण्यासाठी नवीन आरोग्य सेवकाची टीम सज्ज होत असुन महाराष्ट्रात कोराणाची दुसरी लाट पाहुन आता सर्व कडे कोरोणा बद्दल जनजागृती व्हावी व सर्व आरोग्यसेवक व आरोग्यसेविका लॅब टेक्निशीयन यांना टेस्टची माहीती मिळावी यासाठी आज दोडाईचा उपजिल्हा रूग्णालयात डाॅ ललितकुमार चंद्रे व डाॅ अर्जुन नरोटे यांनी त्यांना प्रत्यक्ष रॅपिड टेस्ट ही कशी करतात व तीचे सॅपल घेऊन ती कशी निगेटिव्ह व पॉझिटीव्ह असतात या बद्दल सखोल अशी माहिती दिली.
या टेस्टविषयी सर्वांना माहिती असणे ही एक काळाची गरज पाहुन आता सर्व आरोग्य कर्मचारी यांना कोरोणा विषाणु या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा दोडाईचा उपजिल्हा रूग्णालयात घेतली गेली या कार्यशाळेत शिदखेडा तालुक्यातील विविध PHC मधुन आरोग्यसेविका , लॅब टेक्निशीयन , आरोग्यसेवक यांनी घेतला.





