नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – शिवसेना विभाग प्रमुख महेश कोटीवाले यांनी इंदिरानगर प्रभाग क्र. ७३,व इतर परिसरात असलेल्या विविध समस्या विषयी आयुक्त मा. अभिजीत बांगर यांची भेट घेऊन विस्तृत चर्चा केली. चर्चेअंती नागरिकांना भेडसावत असणाऱ्या सर्व समस्या लवकरात लवकर सोडवल्या जातील असे अश्वासन पालिका आयुक्तांनी दिले आहे .
या भेटीदरम्यान महेश कोटीवाले यांच्या प्रभागातील नागरी समस्या शांताबाई सुतार उद्यानाजवळील तलावामध्ये तुर्भे विभागातील इंदिरानगर, आंबेडकरनगर, गणेश नगर, बोन्सारी गाव , गणपती पाडा , येथील नागरिक उत्तर भारतीय महिला छट पूजेसाठी एकत्र येत असतात. तसेच गणेश व देवी विसर्जन करण्यास सोयीचे होईल या विषयावर मा. आयुक्त साहेब यांच्याशी चर्चा केली असता मा. आयुक्तांनी २-३ दिवसात ताबडतोब तलावाचे शुशोभीकरण करू. असे सकारात्मक आश्वासन दिले, चुनाभट्टी व राजलक्ष्मी क्वारी येथील नागरिकांना पाण्याची समस्या आहे. महापालिकेकडून सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्यामुळे येथील नागरिक त्रस्त आहेत. याविषयावर आयुक्तांशी चर्चा केली असता आयुक्तांनी तात्काळ संबंधित विषयावर कार्यवाही करणेबाबत संबंधित विभागास आदेशित केले. येत्या आठवड्या भरात संबंधित ठिकाणी नवीन पाईप लाईन टाकण्यात येईल. असे आश्वासन दिले., इंदिरानगर मधील लहान मुले, जेष्ठ नागरिक, महिला, यांचे आरोग्य याकरिता खुले व्यायामशाळा व जॉगिंग ट्रॅक ची मागणी केली असता मा. आयुक्तांनी लवकरात-लवकर कार्यवाही करू असे आश्वासित केले.
या दरम्यान, शिवसेना विभागप्रमुख महेश कोटीवाले, समीर बागवान, शाखाप्रमुख तथा बेलापूर विधानससभेचे उपविधानसभा युवा अधिकारी सिद्धाराम शिलवंत, महेश शिंदे उपस्थित होते.







