आयएएस कपल टीना दाबी आणि अतहर खान यांचा घटस्फोटासाठी अर्ज

Athar khan And Tina dabi

जयपूर – केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 2015 च्या परीक्षेत देशात टॉप येणाऱ्या आयएएस अधिकारी टीना दाबी आणि त्यांचे आयएएस पती अतहर खान नातं टिकवण्यात अपयशी ठरले आहेत. त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात मोठे चढउतार सुरु असल्याचं समोर आलं आहे. दोघांनीही खासगी आयुष्यातील मतभेदांनंतर जयपूरच्या कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. ते परस्पर संमतीने घटस्फोट घेणार आहेत. त्यांचं लग्न 2018 मध्ये झालं होतं. अतहर मुळचे काश्मीरचे आहेत.

 

टीना दाबी 2015 मध्ये UPSC च्या टॉपर राहिल्या आहेत. त्याच वर्षी अतहर खान दुसऱ्या क्रमांकावर होते. ते दोघे आयएएसच्या प्रशिक्षणाच्या काळातच एकमेकांच्या जवळ आले आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. दोघेही राजस्थान केडरचे अधिकारी आहेत. त्यांना जयपूरमध्येच पोस्टिंग मिळाली आहे.

 

टीनाने काही वेळेपूर्वीच आपल्या सोशल मीडियावरील अकाऊंट्सच्या नावातून पतीचं आडनाव असलेलं खान नाव हटवलं आहे. यानंतर अतहर खान यांनी देखील टीनाला इंस्टाग्रामवर अनफॉलो केलं होतं. यानंतर दोघांच्याही लग्नाबाबत अनेक तर्कवितर्क लावण्यात येत होते. 2018 मध्ये दोघांनीही लग्न केलं तेव्हा तो चर्चेचा विषय ठरला होता. अनेक राजकीय नेत्यांनी या टॉपर आयएएस कपलला सुखी आयुष्याच्या सदिच्छा दिल्या होत्या. दुसरीकडे हिंदू महासभेने हा प्रकार लव जिहादचा असल्याचा आरोप करत लग्नाला विरोध केला होता.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here