- गुन्हे शाखा कक्ष 2 ची कारवाई
- 20 लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत
- नवी मुंबई पोलीस आयुक्तांलयातील 20 गुन्ह्यांची उकल
नवी मुंबई (जिल्हा प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – कोविड 19 च्या प्रादुर्भावानंतर नवी मुंबई आयुक्तांलयातून अनेक सोनसाखळी चोरीच्या तक्रारी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. त्या अनुषंगाने नवी मुंबई आयुक्त बिपीन सिंग यांनी वेळोवेळी बैठक घेऊन सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यावर लक्ष केंद्रित करून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना गुन्हे शाखेच्या सर्व शाखांना दिल्या होत्या.
त्यांच्या आदेशावरुन विशेष पथके तयार केली गेली होती. या पथकाने चोरी करताना वापरलेल्या वाहनांचे प्रकार, चोरीचे ठिकाण, चोरीच्या वेळा, वाहनावर बसलेल्या आरोपींचे वर्णन याचे अभ्यासपूर्ण वर्गीकरण केले होते. 
त्यानुसार कौशल्यपूर्ण तांत्रिक तपास करून सोनसाखळी चोरी करणाऱ्या गुन्हेगारांच्या टोळीचा शोध लावला त्यानुसार ओडीसा बॉर्डरवर असणारा मुख्य आरोपी तन्वीर उर्फ दीपक व त्याच्या साथीदाराला कलकत्त्याला पळून जात असताना ओडिसा झारखंड पोलिसांच्या मदतीने धावत्या ट्रेनमधून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे सखोल विचारपूस केली असता नवी मुंबई गुन्हे शाखा कक्ष 2 यांच्याकडे नवी मुंबई परिसरात संबंधित गुन्हेगारांनी केलेले गुन्हे उघडकीस झाले यामध्ये तन्वीर शेख(22),अखिल शरीफ खान(25)तस्शरुफ शेख(22),शबनम शब्बीर शेख(25) यांना अटक करण्यात आली आहे.







