बोदवडला भाजपातर्फे वीज बिल माफीसाठी तहसिलदारांना निवेदन

bodwad-bjp

बोदवड (प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी) – राज्य सरकारने कोरोना संकट काळात नागरिकांना विजबिल माफी देण्याची घोषणा करुन शब्द पाळून बिल माफ करावे महाविकास आघाडी सरकार चा निषेध करण्यात आला. भारतीय जनता पार्टीतर्फे तहसिलदार हेमंत पाटील यांनी 23 रोजी निवेदन देण्यात आले.

 

कोरोना महामारीच्या काळात राज्यातील नागरिकांना भरमसाठ वीज बिल आली. लाँकडावूनमुळे आथिर्क तणावाखाली असलेल्या जनतेला सरकार ने मोठ मोठ्या विजबिलचा शाँक दिला. या बाबतीत जनाक्रोश निर्माण झाल्याने वीज बिलात सवलत देण्याचे महाविकास आघाडी सरकार च्या नेत्यांनी जाहीर केले होते. पण आता या सरकारच्या ऊर्जा मंत्र्यांनी विजबिलात कुठलाही दिलासा मिळणार नाही व नागरिकांना विजबिल भरावे लागतील असे स्पष्ट सांगितले आहे.
दुसरीकडे महावितरण सक्तीचे बिले वसुल करत आहे महाविकास आघाडी सरकार ने विश्वास घात केला आहे. दिलेला शब्द सरकार ने पाळावा अन्यथा सरकारला धुंदीतुन जागे करण्यासाठी विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी भविष्यात राज्यभर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला.

 

या प्रसंगी भाजपा जेष्ठ कार्यकर्ते अंनतराव कुलकर्णी प्र. आ. प्रभाकर पाटील सरचिटणीस भगतसिंग पाटील. सुधीर पाटील. अमोल शिरपूरकर. राजु टापसे. सोपान टाठे. दिलीप घुले. विठ्ठल चौधरी. सौरभ हिवराळे. ही कार्यकर्ते उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here