नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – पाम बीच रोड येथे 19 नोव्हेंबरला एक अज्ञात व्यक्ती जखमी होऊन पडला होता. त्याच्या डोक्याला मार लागला होता, त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर जखमींचा मृत्यू झाला.
याप्रकरणी पोलिसांनी सखोल तपास केला असता संबधित व्यक्तीचा खून झाल्याचे लक्षात आले व याप्रकरणी सानपाडा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झाला पोलिसांनी 24 तासात खुनाचा छडा लावत कोणताही पुरावा नसतानाही नेरुळ येथील ओमप्रकाश शर्मा याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.
आरोपीकडे मृत व्यक्तीने तंबाखुची मागणी केली मात्र आरोपीने मी काय दुकानदार आहे का असे म्हंटले, याचा राग मनात धरून, मृत व्यक्तीने आरोपीला थप्पड मारून, लाथ मारली, याचा राग मनात धरून आरोपीने मागून मृताच्या डोक्यात लोखंडी पाईप टाकून खून केल्याची कबुली दिली.








