खुलताबाद (बाजार सावंगी प्रतिनिधी मूनीर शाह) – बाजार सावंगी.ते जैतखेडया.कडे जाणाऱ्या रोड वर दि. 26 /11/ 20 रोजी रात्री 01:30 वाजता बाजार सावंगी ते जैतखेडा जाणारे रोडवर सावता पेट्रोल पंपाच्या पुढे रेणुका मार्बल दुकानाच्या अलीकडे खबऱ्या मार्फत गोपनीय माहितीच्या आधारे एक दारू बंदी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर छाप्यात एकूण 50 देशी दारू भिंगरी संत्राचे बॉक्स किमती 1 लाख 55 हजार रुपये व एक टाटा एस गोल्ड चार चाकी लोडिंग वाहन क्रमांक एम एच 20 इ.एल.3376 किमती दोन लाख रुपये असा एकूण 3 लाख 55हजार रुपये चा दारूबंदी गुन्ह्याचा माल मिळून आल्याने नमूद आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन खुलताबाद येथे दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पो नी श्री मेहेत्रे, स पो नि श्री बोराडे, पोलीस नाईक विनोद बिघोत पोलीस नाईक यतीन कुलकर्णी पोलीस नाईक महेर पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गरड चपराशी संतोष पुंड होमगार्ड यांच्या पथकाने कारवाई केली.पोलीस नाईक विनोद बिघोत यांच्या तक्रारीवरून खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







