ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – आईवडिलांनी नृत्य आणि मॉडेलिंग करण्यापासून रोखले म्हणून नाराज होऊन वर्षभरापूर्वी घर सोडून गेलेली १६ वर्षांची मुलगी बिहारमध्ये सापडली. तिला तिच्या पालकांच्या ताब्यात दिले आहे. पोलिसांनी ही माहिती दिली.
आईवडिलांनी नृत्य आणि मॉडेलिंग करण्यापासून रोखले म्हणून नाराज होऊन वर्षभरापूर्वी घर सोडून गेलेली १६ वर्षांची मुलगी बिहारमध्ये सापडली. तिला तिच्या पालकांच्या ताब्यात दिले आहे. पोलिसांनी ही माहिती दिली.
पालघर जिल्ह्यातील वसईमध्ये राहणारी ही मुलगी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ‘बेपत्ता’ झाली होती. पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता. मुलीला नृत्य आणि मॉडेलिंगची आवड असल्याची माहिती पोलिसांना तपासातून समजली. तिच्या आईवडिलांचा विरोध होता. तिने अभ्यासाकडे लक्ष द्यावे असे त्यांचे म्हणणे होते. तपास सुरू असतानाच, मुलीचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर दिसून आले. त्यावरून ती बिहारमध्ये असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांच्या माहितीनुसार, बिहारमधील काही प्रॉडक्शन हाऊसमध्ये तिचा शोध घेतला. त्यानंतर एका ठिकाणाहून तिचा संपर्क क्रमांक मिळाला. ती चंपारणमध्ये असल्याची माहिती मिळाली. बिहारमध्ये असताना, तिने उपजिविकेसाठी चित्रपटांमध्ये काही भूमिका केल्या होत्या.







