किनगाव येथे महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिनानिमित्त प्रतिमापूजन

kingaon

यावल (प्रतिनिधी सुरेश पाटील) – दिनांक-२८ नोव्‍हेंबर महात्‍मा ज्‍योतिबा फूले स्‍मृतिदिना निमित्‍त किनगांव येथील क्षत्रिय माळी समाज मंगल कार्यालय आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्‍हणुन आमंत्रित खांदेशाचे चित्रपट अभिनेते ,निर्माता व डायरेक्‍टर बाबुलाल पाटील होते.

 

बाबुलाल पाटील यांच्यासह अध्‍यक्षांनी महात्‍मा ज्‍योतिबांचे प्रतिमापूजन केले तदनंतर बाबुलाल पाटील यांनी सुरूवातीला महात्‍मा ज्‍योतिबा फूले यांच्‍या समाज कार्यावर मनोगत व्‍यक्‍त करून मनोरंजन म्‍हणुन प्रेक्षकांच्‍या आग्रहानुसार -अमरिश पुरी व दादा कोंडके आदी अभिनेते व बॉलीवुड गायकांच्‍या आवाजांची मिमिक्री करुन प्रेक्षकांना पोट धरेपर्यंत आपल्‍या मिमिक्री कलेतुन हसवले.

 

यावेळी मंचावर किनगांव मधील शिक्षण महर्षि सुकलाल महाजन गुरूजी कार्यक्रमाचे अध्‍यक्ष होते.तसेच नव्‍यानेच लेफ्‍टनंट पदी रूजू झालेले तरूणांना तडफदार व्‍यक्‍तीमत्‍व म्‍हणुन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लेफ्‍टनंट राहुल अरूण पाटील लाभले होते. अरुण टेलर, रोहिदास महाजन आदी मान्‍यवर उपस्थित होते. तसेच सर्व रसिक,आबालवृद्‍ध ,तरूण मंडळी होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेन्द्र महाजन यांनी केले.

 

https://www.facebook.com/BulandPoliceTimes/videos/916379072099582/?t=1

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here