वणी (यवतमाळ) – तालुक्यातील पिंपरी जंगलात सुरू असलेल्या कोंबड्यांच्या झुंजीवर छापा टाकून पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यावेळी पाच जणांना अटक करण्यात आली. जिल्ह्यामध्ये सलग तिसऱ्यांदा कोंबड्यांच्या झुंजीवर पोलिसांनी छापा टाकला आहे.
वणी तालुक्यातील कायर बीट अंतर्गत पिंपरी येथे जंगलात काही व्यक्ती पैशावर कोंबड्यांची झुंज लावून जुगार खेळत आहेत, असी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. पोलिसांची चाहून लागताच 10 ते 15 व्यक्तींनी घटनास्थळावरुन पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करत 5 जणांना ताब्यात घेतले व मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांनी धाड टाकलेल्या कोंबड्यांच्या झुंजीतील घटनास्थळावरून एकूण 5 लाख 44 हजार 940 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शिरपूरचे ठाणेदार सचिन लुले यांच्यामार्गदर्शनात पोलिसांनी केली.







