खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – औरंगाबाद शहरातील जालांन नगरमधील एका उद्यानात दोन गट आपसात भिडले. लाठ्या-काठ्यांनी तरुणांनी एकमेकांवर हल्ला केला. एका तरुणीवरून झालेल्या वादातून ही हानामारी झाल्याचं बोललं जात आहे. पोलील आल्याचं पाहाताच दोन्ही गटांतील तरुणांनी पोबारा केला. मात्र, या घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे.
मिळालेली माहिती अशी की, एका तरुणीवरून तरुणांच्या दोन गटात वाद झाला. काही वेळातच हा वाद वाढला. तरुणांच्या दोन गटांनी लाठ्या-काठ्या घेत एकमेकांवर हल्ला चढवला. ही घटना शहरातील जालांन नगर भागातील एका उद्यानात घडली.
या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून पोलीस आल्याची कुणकुण लागताच दोन्ही गटांनी पळ काढला. या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात दुपारपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. पोलीस हाणामारी करणाऱ्या तरुणांचा शोध घेत आहेत.







