भोपाळ – गुन्हे शाखेच्या पोलिसांनी भोपाळमधील कोलार येथील स्पा सेंटरवर मोठी कारवाई केली. खबऱ्यांमार्फत मिळालेल्या माहितीनंतर छापे मारले. स्पा सेंटरच्या आडून देहव्यापार सुरू होता. सेंटरमधून तीन महिलांसह पाच जणांना अटक केली आहे. स्पा सेंटरच्या आडून देहव्यापार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांकडून अटकेतील आरोपींची चौकशी सुरू आहे.
खबऱ्यांकडून माहिती मिळाल्यानंतर खात्रीशीर माहिती मिळवली. त्यानंतर पोलिसांनी छापेमारी केली. स्पा सेंटरमधून ताब्यात घेतलेली महिला ही परराज्यातील असल्याचे सांगण्यात येते. मागणीनुसार, त्यांना स्पा सेंटरमध्ये बोलावण्यात येते. महिला कानपूर आणि नेपाळच्या राहणाऱ्या आहेत. तर एक जण भोपाळमधील बैरागढचा रहिवासी आहे. कोलारच्या एका प्लाझामध्ये हे स्पा सेंटर आहे. पोलिसांनी त्या ठिकाणी बोगस ग्राहक पाठवला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पा सेंटरमध्ये तीन महिला आणि पुरूष नको आक्षेपार्ह अवस्थेत सापडले. तसेच सेंटरमध्ये अनेक आक्षेपार्ह वस्तूही आढळून आल्या. स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली देहव्यापार सुरू होता. येणाऱ्या ग्राहकांकडून मोठी रक्कम वसूल केली जात होती. ग्राहकांशी मेसेज आणि फोनवरून संपर्क साधून त्यांना स्पा सेंटरमध्ये बोलावले जायचे. पोलिसांनी स्पा सेंटरच्या मॅनेजरलाही अटक केली आहे.







