डेटिंग ॲपद्वारे ओळख झालेल्या महिलेने घातला वीस लाखांना गंडा

dating-app-lady

नाशिक सायबर पोलिसांची कारवाई

नाशिक (विशेष प्रतिनिधी) – ‘टुली मॅडली’ डेटिंग अॅपद्वारे ओळख करत विश्वास संपादन करून महिलेने साडे एकोणीस लाखांना गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी दिल्ली येथून दोघा संशयितांना नाशिक सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत…

 

 

अधिक माहिती अशी की, ‘टुली मॅडली’ डेटिंग अॅप फिर्यादींनी डाऊनलोड केले होते. यानंतर मोनिका सिंग नामक एका महिलेशी त्यांची ओळख झाली. त्यांनंतर त्यांचे संपर्क क्रमांकांची देवान घेवाण झाली. दरम्यान, ही महिला अमस्टरडम, नेदरलंड येथील असून ती बोरटड फार्मासिटीकल नावाच्या कंपनीत ती सहायक प्रोडक्शन अॅनलिस्ट म्हणून काम करते असे सांगितले.

 

 

या कंपनीत व्हायरोलॉजिकल आजारांचे उपचार करण्यासाठी Ogrinma Herbal Oil Extract मटेरियल लागते. ते रॉ मटेरीयल या महिलेची कंपनी इंडोनेशिया येथून आयात करते. व आता हे तेल दक्षिण भारतात राहणारे राजेश नंदी (रा. अतनुर ता. भालकी, जि बिदर कर्नाटक) हे देणार आहेत. या व्यक्तीचा मोबाईल क्रमांक दिला. त्यानंतर फिर्यादींनी या क्रमांकावर संपर्क साधला व त्यांना सहा लिटरचे तेल कुरियर द्वारे दिले. नंतर ते तेल घेऊन २६ नोव्हेंबर रोजी बंगलोर येथे जाऊन कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे भासविणाऱ्या बर्नाड फाबियान नावाच्या व्यक्तीला भेटले.

 

 

त्याने ते चेक करून योग्य तेल असल्याचे सांगितले. यानंतर मोनिका सिंग या महिलेने त्यांना २०० लिटरची ऑर्डर दिली. यानंतर वेगवेगळ्या बँकेच्या खात्यावर पैसे भरण्यास सांगून जवळपास १९ लाख ६० हजार रुपयांची रक्कम भरून घेत फसवणूक केली.

 

दरम्यान, फिर्यादीची फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर त्यांनी पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार कथन केला.यानंतर नाशिक सायबर पोलिसांनी याबाबतचे तांत्रिक आणि बँकेचे विश्लेषण केले. यानंतर पोलीस उपनिरीक्षक दानिश मन्सुरी यांच्यासह पोलीस नाईक राहुल जगझाप, पोलीस शिपाई अंकित निकम, भूषण देशमुख व पोलीस मित्र श्रीराम निकम यांच्या पथकाने थेट दिल्ली गाठून बँकेत सापळा रचला. यादरम्यान, व्हिक्टर डॉमिनिक ओकोन वय ४२, उत्तम नगर नवी दिल्ली व पवन कुमार हरकेश बैरवा वय २४ रा बढोसरा दक्षिण पश्चिम दिल्ली, यांना अटक केली. यावेळी संशयितांनी पोलिसांसोबत झटापट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नाशिकच्या सायबर पोलिसांनी शिताफीने त्यांना दिल्लीहून १२ तासांत सायबर पोलीस ठाणे नाशिक शहर याठिकाणी आणण्यात आले.

 

या दोघा संशयितांच्या कडून आणखीही काही गुन्हे उघडकीस येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेचा तपास पोलीस उपायुक्त संग्रामसिंग निशानदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देवराज बोरसे करत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here