लाखोंच्या घरफोड्या करणारा ‘गब्बर’ कोनगाव पोलिसांच्या जाळ्यात

thane-gharphodi

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – लाखोंच्या घरफोड्या करणाऱ्या टोळीला कोनगाव पोलीसांनी अटक केली आहे. या टोळीने भिवंडी तालुक्यातील भूमी इंडस्ट्रियलमधील कृष्णा फॅब्रीक्सच्या गोदामातून ७ लाख ६८ हजार रुपयांचे सोफ्याकरिता लागणारे कापड तसेच वेगवेगळ्या कंपनीचे रोल लंपास केले होते. या प्रकरणी तीघांना अटक करण्यात आली आहे. गब्बर उर्फ अजय हरिजन (३५) रा. एरोली, नवीमुंबई, मोहम्मद इरफान जैनुलआबिदिन शेख (२७) रा. वडाळा मुंबई, संतोष खरात (३८) रा. एरोली, नवीमुंबई, असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. या आरोपींकडून लाखोंचा मुद्देमाल तसेच टेम्पो जप्त करण्यात आला आहे.

 

 

या प्रकरणातील मुख्य सुत्रधार असलेला गब्बर नावाचा आरोपी काही दिवसांपूर्वीच जेलमधून सुटला होता. त्यांनतर त्याने पुन्हा घरफोडी करण्यासाठी दोन साथीदारांसह कट रचला. त्यानुसार २८ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास कृष्णा फॅब्रीक्सच्या गोदामात साठवलेले महागडे सामान या टोळीने लंपास केले. विशेष म्हणजे गब्बर हा घरफोडीतील सराईत गुन्हेगार असून तो मूळचा उत्तरप्रदेशच्या बनरसचा रहिवाशी आहे. त्याच्यावर अनेक घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती भिवंडी पोलिसांनी दिली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here