मायेची ऊब,प्रत्येकाला देते सुख….परिस्थिती कोणतीही असो, माय-ममतेची येते सतत आठवण – मयुर कोळी

bayajabai-dondaicha

दोडाईचा (विशेष प्रतिनिधी) – माय म्हटले काय? आणि जन्म देतीला, आई, मम्मी, मम म्हटले काय? स्रीमातुत्व विषयी ह्या पुथ्वीवर प्रत्येकाच्या मनात जिव्हाळा, प्रेम, ममत्व, भावना ह्या प्रत्येकाला सारख्याच येत असतात, अशाच विशाल मन, मोठा परिवार, चांगले संस्कार आमच्यावर घातलेल्या,आमची माय अर्थात कै.बायजाबाई विषयी त्यांच्या पुण्यस्मरण दिनी आठवण म्हणून का?असेना घरातील प्रत्येकाला ” मायेची ऊब सुख देते, परिस्थिती कोणतीही असो, मायचे स्मरण केल्याने दु:ख दुर होत असते. म्हणून आज त्यांच्या पुण्यस्मरण दिनी काही भावना आपल्याशी व्यक्त करावयासे वाटत आहे, असे उदगार कोळी समाजाचे शहराध्यक्ष श्री मयुर कोळी यांनी आज जनमत कार्यालयात व्यक्त केले.

 

जगातील प्रत्येक व्यक्ती, आईला देवाचे दुसरे रूप मानतात. आई ह्या शब्दात दोनच अक्षरे आहेत. पण ह्या शब्दात नभाईतके सामर्थ्य आहे. आईच्या ममते पुढे साऱ्या जगाचे प्रेम फिके पडते.सर्व दैवतात आई हे दैवत थोर आहे. प्रत्येकाला जगात आल्यावर आपल्यावर मनसोक्त, निस्वार्थ प्रेम करणारी एकमेव आई असते. तसेच जीवन कसे जगावे हे सांगणारी पहिली गुरु, शाळा आई हीच असते. म्हणजे छत्रपती शिवरायांना घडवण्यामध्ये जसे जिजामाताचे महत्त्व आहे. तसे प्रत्येकाला आपले आयुष्य चांगले घडवण्यासाठी जी आई दिवसरात्र मेहनत घेते,ती आई ही जिजामाता एवढीच थोर आहे, त्यापेक्षा कमी नाही,असे मला म्हणावेसे वाटते. म्हणून माझ्याजवळ याच्यापेक्षा सांगायला आता शब्दच नाही,व अशातले काही संस्कार आमच्यावर आमची माय ,कै.बायजाबाई यांनी घडविले आहेत. म्हणून आमच्या सोनवणे(कोळी) परिवाराची जी गावात सामाजिक, राजकीय, व्यवसायिक वाटचाल चालू आहे. त्याला एकमेव कारणीभूत म्हणजे आमच्या मायचे संस्कार होत, असे गर्वाने मला म्हणावसे वाटते. आज माय जायायला जवळपास चार वर्षे होऊन जात आहे. तरी परिवाराची एकत्रित घोडदौड व्यवस्थित सुरु आहे.

 

आज मायने परिवाराला दिलेले आचार, विचार, व्यापारी, सामाजिक, राजकीय संस्कारामुळे गावात साईबाबा मिठाई दुकान, स्टेशन भागात बसस्टँड समोर गणेश रेस्टॉरंट, हस्ती टाँवरमध्ये बालाजी कोल्ड्रिंक्स, मांडळ रस्त्यावरील भाऊ हाँटेल, चुडाणे रस्त्यावरील राज कुषी फार्म हाऊस आदी प्रतिष्ठान सुरळीतपणे चालू आहेत.म्हणून माय व तिचे विचारांची ऊब ,आजही जिवंत असल्याचे आमच्यात दिसते,असेही शेवटी श्री मयुर सोनवणे यांनी भावनशील होत मत व्यक्त केले.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here