अभिनेता स्वप्निल जोशीला ऑनलाइन गंडा घालण्याचा प्रयत्न

swapnil-joshi

मुंबई (हितेश मिस्त्री) – सध्या जगभरामध्ये सायबर सुरक्षा हा एक महत्त्वाचा विषय बनला असून अनेक संकेतस्थळाद्वारे आणि समाज माध्यमांचा वरून ग्राहकांच्या पर्सनल डेटा तसेच सोशल मीडिया अकाउंट हॅक होण्याचे प्रकार नेहमीच घडत असतात. यामध्ये अनेक सेलिब्रिटींचे अकाउंट हॅक होण्याचे प्रकार देखील नवीन नाहीत. त्याचबरोबर अनेकदा या सेलिब्रिटींच्या नावे फेक अकाउंट ओपन करून खोटी माहिती पसरवली गेल्याच्या घटना देखील घडतात.

 

असाच काहीसा प्रकार मराठी अभिनेता स्वप्नील जोशी यांच्यासोबत बुधवारी रात्री घडला आहे. याबद्दल स्वप्निलने स्वतः माहिती दिली आहे. स्वप्निल च्या इंस्टाग्राम अकाउंट सोबत हा प्रकार एका मोठ्या प्रमाणात फॉलोवर्स असलेल्या अकाऊंट द्वारे होत असल्याच स्वप्निलने सांगितलं. मात्र स्वप्निल जोशीच्या सोशल मीडिया टीमने वेळीच सावधानता दाखवत स्वप्निलचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक होण्यापासून वाचवले आहे. याबद्दल माहिती देताना स्वप्निल ने स्वतः त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून एका व्हिडिओद्वारे लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवली आहे.

 

या व्हिडिओमध्ये बोलताना स्वप्नीलने सांगितले की, त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट सोबत हॅक होण्याचा प्रकार घडल्याने इतरांनी देखील यापासून सावधानता बाळगावी तसेच या आधी देखील अनेक सेलिब्रिटीज सोबत असा प्रकार घडल्याचे त्याने सांगितलं. त्याचबरोबर त्यांनी यावेळी त्याच्या चाहत्यांना आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरील आयडी आणि पासवर्ड कोणालाही शेअर न करता गुप्त ठेवण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे प्रत्येकानेच आपल्या सोशल मीडियावरील अकाउंट ची सुरक्षितता जपण्याचा शक्य तितका प्रयत्न करणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here