रावेर (जिल्हा प्रतिनिधी हमीद तडवी) – येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येथिल डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्या जवळ भारतीय बौध्द महासभा रावेर तालुका कार्यकारिणी तर्फे आयोजित कार्यक्रमात आदरांजली वाहून अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रथम रावेर तालुक्याच्या तहसीलदार उषाराणी देवगुणे, पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, नगराध्यक्ष दारा मो. जफर मो., आदिवासी विकास विभाग उपायुक्त सुदर्शन नगरे,माजी नगराध्यक्ष हरीश गणवानी, पद्माकर महाजन, ज्ञानेश्वर महाजन, नगरसेविका रंजना गजरे,नगरसेवक जगदिश घेटे, कामगार नेते दिलीप कांबळे, युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष पंकज वाघ, वंचित आघाडी तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे, अनुसूचित जाती विभाग जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष राजू सवर्णे, पत्रकार दिपक नगरे,भारतीय बौद्ध महासभा तालुका सचिव नगीनदास इंगळे सर, भारतीय बौद्ध महासभा रावेर शहराध्यक्ष दिपक तायडे सर,भूमिअभिलेख उपअधीक्षक राजू घेटे, यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
यानंतर सामूहिकरित्या त्रिशरण पंचशील, भीमस्मरण व भीमस्तुती घेण्यात आले.तसेच उपस्थित सर्व मान्यवरांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली.यावेळी माजी नगरसेवक ऍड. योगेश गजरे, कॅनरा बँकेचे मॅनेजर भालेराव साहेब, केंद्रीय शिक्षक संघरत्न दामोदरे, भारतीय बौद्ध महासभेचे संस्कार विभागाचे सचिव बौद्धचार्य राजेंद्र अटकाळे,सामाजिक कार्यकर्ते संघरक्षक तायडे,सामाजिक समता मंच कार्याध्यक्ष उमेश गाढे,समता सैनिक दलाचे बाळू रजाने,महाराष्ट्र राज्य विद्युत युनियनचे भिका साळुंखे,पीपल्स को ऑप. बँकेचे मॅनेजर प्रकाश महाले,भारतीय बौद्ध महासभेचे कार्यालयीन सचिव सदाशिव निकम, ऍड. दिपक गाढे,प्रा.चतुर गाढे,प्रकाश सूरदास सर, रमण तायडे सर,एलआयसीचे सेवानिवृत्त अधिकारी भागवत तायडे,प्रा. संदीप धापसे,पत्रकार राहुल गाढे,दिलीप साबळे, मुकुंदा इंगळे सर,पुंडलिक कोंघे,पत्रकार नाना वानखेडे, मनोहर गाढे, प्रदीप घेटे,नरेश गजरे,बाबा साळुंखे,अनिल घेटे, बबलू अवसरमल,किशोर तायडे,विशाल भालेराव, यांचेसह असंख्य मान्यवर उपस्थित होते.सुत्रसंचालन नगीनदास इंगळे यांनी तर सरणेत्तर राजेंद्र अटकाळे यांनी केले.








