पाचोरा (प्रतिनिधी शेख जावीद) | पाचोरा येथे ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त मुस्लिम बांधवांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. आठवडे बाजार येथून सुरू झालेली ही रॅली प्रकाश टॉकीज, श्री राजे छत्रपती महाराज चौक, जामनेर रोड, गांधी चौक मार्गे पुन्हा आठवडे बाजार येथे येऊन उत्साहात समाप्त झाली.
या रॅलीमध्ये सुमारे पाच ते सहा हजार मुस्लिम बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. लहान बालगोपाळांनीही मोठ्या उत्साहाने रॅलीत सहभागी होत आनंद साजरा केला.
यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी मुस्लिम बांधवांचे स्वागत केले याप्रसंगी मार्केट कमिटीचे चेअरमन गणेश पाटील, नगरसेवक सुमित किशोरआप्पा पाटील शेख जावीद पत्रकार किशोर बारवकर, संदीप राजे पाटील, अशोकआप्पा पाटील, किशोर पाटील, संजय गोहिल, संजय चौधरी, सलीम शेख, रेहमान तडवी, सुमित सावंत, छोटू चौधरी, प्रदीप वाघ, रफिक बागवान, अबुलेस शेठ, डॉ.आलम देशमुख यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.रॅलीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पाचोरा पोलीस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप शेवाळे, PSI श्रीकृष्ण गाया, PSI शकील शेख, PSI योगेश गणगे यांच्यासह पोलीस कर्मचारी व होमगार्ड मोठ्या संख्येने बंदोबस्तासाठी तैनात होते.शांतता, शिस्त आणि उत्साहाच्या वातावरणात ही रॅली पार पडली.







