मुक्ताईनगर पोलिसांनी केले घरफोडी, दुचाकी चोरी करणा-या तिघांना जेरबंद

arrested
file photo

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) । शहरात गेल्या दि. ७ व ८ ऑक्टोबर रोजी घरफोडी, दुचाकी चोरीची घटना घडली होती. त्यातील तिघांना अटक करून चोरी गेलेली २ वाहने, ९४ हजार ५०० रुपयेची दागिने व १० हजार रुपये रोख असा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे. दरम्यान संशयित आरोपीना न्यायालयात हजर केले असता ४ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

घरफोडी व वाहन चोरीतील अटक करण्यात आलेले आरोपी प्रदीप हिवराळे (वय ३० वर्षे), अतुल हिवराळे (वय ३० वर्षे), रवी हिवराळे (वय ४० वर्षे, सर्व रा. अंबिकापुर ता. खामगाव जि. बुलढाणा) असे आहे. शहरात डॉ. आंबेडकर नगर व पंचायत समिती जवळ घरफोडी झाली होती. तसेच घोडसगाव व मुक्ताईनगर येथून २ मोटारसायकली चोरून नेल्या होत्या. या संदर्भात गुप्त माहितीनुसार, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील, हवालदार महेंद्र सुरवाडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अजय खंडेराव, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र धनगर, पोलीस कॉन्स्टेबल अमोल जाधव, पोलीस कॉन्स्टेबल अक्षय वाडे अशा पथकाने तपासाची चक्रे फिरवून आरोपींना बुलढाणा जिल्ह्यातील व खामगाव तालुक्यातील अंबिकापुर येथून ताब्यात घेतले. त्यांनी चोरीत वापरलेली चार चाकी डिझायर हे वाहन सुद्धा पोलिसांनी हस्तगत केले आहे. न्यायालयात हजर केले असता त्यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here