तीन हजारांची लाच घेतांना एरंडोल पोलिस ठाण्याचा हवालदार धुळे एसीबीच्या जाळ्यात

bribe-to-police
File Photo

धुळे (उपसंपादक प्रशांत सूर्यवंशी) । अपघाताच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी तीन हजारांची लाच मागून ती स्वीकारताना एरंडोल पोलिस ठाण्यातील हवालदार बापू लोटन पाटील यास धुळे एसीबीने अटक केली आहे.धुळे एसीबीचे डॅशिंग पोलिस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वात हा सापळा यशस्वी करण्यात आला.

एरंडोल पोलिस ठाणे हद्दीत अपघात घडल्यानंतर तक्रारदाराचे वाहन पोलिसांनी जप्त केले आहे तर या अपघातात तक्रारदारही जखमी असून वाहन सोडण्याच्या मोबदल्यात तसेच गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी तडजोडीअंती हवालदार बापू लोटन पाटील यांनी तीन हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. तक्रारदाराने धुळे एसीबीकडे संपर्क साधल्यानंतर लाच पडताळणी करण्यात आली व सापळा रचण्यात आला. गुरुवारी दुपारी एरंडोल चौफुलीवर पैसे स्वीकारण्याचे ठरले व पैसे स्वीकारताच हवालदाराला अटक करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here