नंदूरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – ज्ञानसूर्य , ज्ञानाचा अथांग महासागर महामानव , भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी चर्मकार समाजाची बुलंदतोफ राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री भानुदासजी विसावे व मा. नगराध्यक्ष सौ. अंजलीताई भानुदासजी विसावे तसेच नगरसेवक नरेंद्र नगराळे , अमृत लोहार जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, जितेंद्र अहिरे युवा जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय चर्मकार महासंघ नंदुरबार , छोटू अहिरे जिल्हाध्यक्ष चर्मकार उठाव संघ नंदुरबार , विजय तीजवीज संपादक न्याय-अन्याय , लक्ष्मण चव्हाण शहराध्यक्ष मागासवर्गीय सेल भाजपा , वामन अहिरे माजी अध्यक्ष चर्मकार समाज यांचे हस्ते सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीत आज सकाळी ०८ वाजता नवापूर शहरात महापरिनिर्वाण दिनानिमत्ताने विश्वभुषण , भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे करण्यात आले होते.








