नंदूरबार (जिल्हा क्राइम रिपोर्टर डॉ रामचंद्र जाधव) | ग्राम विकासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत प्रशासनाच्या माध्यमातून ग्रामीण विकासासाला गती देणारे बामखेडा त, त, मोहिते त श व शिरुड ता शहादा जि नंदुरबार येथील ग्रामपंचायत अधिकारी श्री हिम्मत रणछोड वंजारी यांची 2024-25 च्या राज्य स्तरीय आदर्श ग्राम पंचायत अधिकारी पुरस्कारासाठी नंदुरबार जिल्ह्यातून एकमेव निवड झाली आहे
त्यांच्या या निवडीने शहादा तालुका आणि जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे श्री हिम्मत वंजारी हे शहादा तालुकातील बामखेडा त, त, मोहिदे त श व शिरुड या ग्राम पंचायती च्या कामकाजाची जबाबदारी सांभाळत आहेत
ग्राम पंचायतीच्या माध्यमातून शासनाच्या विविध लोक जनकल्याणकारी योजना तळागाळातील नागरिका पर्यंत पोहचविणे विकासकामांचा सातत्याने पाठपुरावा करणे, ग्रामस्थांच्या समस्या जाणून ते सोडविण्यासाठी पुढाकार घेणे आणि प्रशासन व नागरिक याच्यात प्रभावी समन्वय निर्माण करण्याचे काम त्यांनी सातत्याने केले आहे विशेष म्हणजे सन 2024-25या वर्षासाठी राज्य स्तरीय आदर्श ग्राम पंचायत अधिकारी पुरस्कारासाठी नंदुरबार जिल्ह्यातून हिम्मत रणछोड वंजारी यांची एकमेव निवड झाली असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
हा पुरस्कार माझ्यासाठी केवळ सन्मान नसून ग्राम विकासाच्या कामाला मिळालेली मोठी प्रेरणा आहे ग्राम पंचायतीच्या माध्यमातून शासनाच्या विविध प्रकारचे योजना प्रभावीपणे गावातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्याचा प्रमाणिक प्रयत्न केला आहे होणारा सन्मान माझ्या एकट्याचा नसुन ग्राम पंचायत पदाधिकारी, कर्मचारी, आणि ग्रामस्थांचा सहकार्याचा आहे.







