जळगाव (संपादक सुनिल पाटील) | अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार मलिकार्जुन खरगे साहेब यांच्या हालदाणी उत्तराखंड येथील सभेनंतर काही जातीयवादी उजव्या सरणीच्या लोकांनी त्या स्टेजची व ग्राउंडची होम हवन पूजा करून शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न केला याच्या निषेधार्थ जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष एडवोकेट अविनाश भालेराव यांच्या नेतृत्वात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा जवळ तीव्र निदर्शने करून आंदोलन करण्यात आले
ज्यांनी हे कृत्य केले त्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी व या प्रकरणाची त्यांना पाठीशी घालणाऱ्या भाजपने माफी मागावी अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी विविध घोषणा देण्यात आल्या
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी सचिव एडवोकेट सलीम पटेल प्रदेशचे प्राध्यापक अशोक खलाणे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष पवार ज्येष्ठ नेते श्रीधर चौधरी सरचिटणीस विजयकुमार कोसोदे माजी शहर जिल्हाध्यक्ष श्याम भाऊ तायडे विजय वाणी तालुकाध्यक्ष मनोज चौधरी ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष किरण महाजन एससी सेल अध्यक्ष एडवोकेट अंकुश कटारे प्रदेश सचिव राहुल मोरे सरचिटणीस बाबा देशमुख प्रदीप सोनवणे नदीम काझी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मुजीब पटेल प्रताप पाटील जाकिर बागवान दीपक सोनवणे राजीव महाजन छाया कोरडे अर्चना गाडे दिनेश पवार किरण पाटील आनंद बागुल डॉक्टर अनिरुद्ध साळवे कुणाल कोळी महेश पाटील चेतन कदम मुरलीधर चौधरी अजमल शहा अब्दुल शहा एडवोकेट बाविस्कर इस्माईल तांबोळी मनोज पाटील राजेंद्र पाटील सुदाम चौधरी सुदाम माळी किशोर महाजन यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते हजर होते.







