बार्शी शहर पोलिसांची धडक कारवाई: ४ बुलेटसह १० दुचाकी जप्त; दोन सराईत चोरट्यांना बेड्या

बार्शी शहर पोलिसांची

सोलापूर (महाराष्ट्र राज्य क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) | बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेल्या दुचाकींचा छडा लावण्यात गुन्हे प्रकटीकरण पथकाला (D.B. Squad) मोठे यश आले आहे. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदाराच्या आधारे पोलिसांनी दोन सराईत वाहनचोरांना जेरबंद केले असून, त्यांच्याकडून तब्बल ८ लाख २० हजार रुपये किमतीच्या एकूण १० मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, यामध्ये ४ महागड्या रॉयल एनफिल्ड (बुलेट) गाड्यांचा समावेश आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकाश हरिश्चंद्र राठोड (वय १९, रा. कन्हेरगाव, ता. परळी, जि. बीड),  ऋषिकेश महादेव सुरवसे (वय २१, रा. मांजरी, ता. व जि. लातूर) यांना अटक केली हे.

राऊत चाळ, स्टेशन रोड, बार्शी येथील रहिवासी प्रतीक चंद्रकांत पवार यांची १ लाख २५ हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची बुलेट (क्र. MH25AY2476) दिनांक ६ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री राहत्या घरापुढून अज्ञात चोराने लांबवली होती. या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता (गुन्हा रजि. क्र. ६०१/२०२६, BNS ३०३(२)).

या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना, बार्शी शहर पोलिसांच्या डी.बी. पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे बीड आणि लातूर येथील दोन संशयितांना ताब्यात घेतले. पोलीस कोठडीत (PCR) आरोपींकडे कसून चौकशी केली असता, त्यांनी बार्शीसह लातूर, पुणे, इंदापूर, येडशी व इतर भागांतून वाहने चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून खालील वाहने हस्तगत केली आहे. यात १ हीरो कंपनीची काळ्या रंगाची ग्रे पट्टा असलेली स्पलेंडर प्लसMH24AQ4764, २काळ्या रंगाची बुलेट 350 FFLMH25AY2476, ३,हीरो कंपनीची काळ्या रंगाची ग्रे पट्टा असलेली स्पलेंडर MH24Z9166, ४ रॉयल एनफिल्ड 350 ग्रे रंगाची बुलेटMH04GQ1500, ५ रॉयल एनफिल्ड 350 ग्रे रंगाची बुलेटMH12QS9081, ६ रॉयल एनफिल्ड 350 चॉकलेट रंगाची बुलेटप्राप्त, ७ हीरो कंपनीची काळ्या रंगाची लाल पट्टा असलेली एचएफ डीलक्स MH42AT1697, ८ हीरो कंपनीची पॅशन प्रो ग्रे पट्टा असलेलीMH24BC7036, ९ हीरो होंडा कंपनीची काळ्या रंगाची निळा पट्टा असलेलीप्राप्त होणेवर, १० बजाज कंपनीची काळ्या रंगाची मोटारसायकलप्राप्त होणेवर जप्त करण्यात आलेल्या इतर वाहनांच्या मूळ मालकांचा व संबंधित गुन्ह्यांचा शोध घेण्याचे काम सध्या सुरू आहे.

ही धडक कारवाई सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. विजय कबाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. गणेश कुंभार यांच्या नेतृत्वात पार पडली.

तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक अभयकुमार माकणे, पोलीस हवालदार प्रवीण साठे, सुनील बनसोडे, महिला पोलीस हवालदार शबाना कोतवाल, पोलीस कॉन्स्टेबल धनराज फतेपुरे, सचिन देशमुख, अजिज शेख, अंकुश जाधव, दत्ता सोमवाड, अविनाश पवार, राहुल उदार, प्रल्हाद अकुलवार, सचिन नितनावरे, सतीश उघडे, सचिन राऊत तसेच सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल सोनकर यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here