पंढरपूर (रिपोर्टर प्रकाश इंगोले) | नवनाथपंथी कामगार संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य मुख्य कोअर कमिटीची पहिली महत्त्वाची बैठक आपले सर्वांचे आराध्य दैवत श्री क्षेत्र कारुंडे येथील नाथबाबाच्या मुख्य गाभाऱ्यासमोर सर्वांच्या साक्षीने गुलालाची शपथ घेऊन अत्यंत उत्साहात पार पडली. या बैठकीत संघटनेच्या पुढील कामकाज आणि विस्ताराबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
बैठकीत जाहीर करण्यात आलेली नवनिर्वाचित मुख्य कोअर कमिटी पुढीलप्रमाणे आहे: अध्यक्षपदी श्री. महादेव सावळा शिंदे, कार्याध्यक्षपदी श्री. नंदकुमार नामदेव शेगर, श्री. संभाजी निवृत्ती इंगोले, श्री. सुभाष धोंडीराम भोसले व श्री. सुरेश तुकाराम साळुंखे, उपाध्यक्षपदी श्री. अनिल दगडू शिंदे, श्री. अर्जुन संभाजी शिंदे, श्री. आदिनाथ बाबुराव इंगोले व श्री. भगवान राजाराम शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच महासचिवपदी श्री. सर्जेराव विठोबा जाधव, सचिवपदी श्री. शिवाजी रामा भोसले, श्री. संजय सिद्धू इंगोले, श्री. सुनील भगवान शेगर व श्री. अक्षय सुदाम सावंत, खजिनदारपदी श्री. वैभव नंदकुमार शेगर, प्रवक्तापदी श्री. भैरू शंकर भोसले व श्री. श्रीधर मारुती शिंदे, प्रसिद्धीप्रमुखपदी श्री. रवींद्र सर्जेराव जाधव व श्री. अक्षय शिवाजी शिंदे, तर संघटक पदाची जबाबदारी श्री. नवनाथ जगन्नाथ जगताप, श्री. बाबाजी सुदाम शिंदे व श्री. रामा धोंडीराम चव्हाण यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. याशिवाय हरिश्चंद्र रामचंद्र जाधव आणि श्री. भैरवनाथ भीमराव आहेर हे सदस्य म्हणून काम पाहणार आहेत.
बैठकीमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांनी विश्वासाने व प्रामाणिकपणे संघटनेचे कामकाज करण्याचे आणि संघटना वाढविण्याचे वचन दिले. दरम्यान, जर कोणीही व्यक्ती संघटनेशी गद्दारी करेल, पदाधिकाऱ्यांना किंवा सदस्यांना अपशब्द बोलेल, खोटेनाटे सांगून फसवणूक करेल अथवा संघटनेच्या हिताला बाधा आणेल, अशा सभासद किंवा पदाधिकाऱ्यास संघटनेमधून कायमस्वरूपी काढून टाकण्यात येईल, असा कडक निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
सर्व बैठकीच्या सुरुवातीला सर्वांनी नाथबाबाचे व जोगाई मातेचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या आजवरच्या इतिहासामध्ये अशी समाजोपयोगी, कायदेशीर अधिकार व हक्क मिळवून देणारी संघटना कोणीही स्थापन केली नव्हती. संघटनेचे अध्यक्ष महादेवजी शिंदे (पुणे) आणि सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे ही संघटना उभी राहून कायदेशीर रजिस्टर करून घेण्यात आली, असे यावेळी सांगण्यात आले. यापुढे समाजातील दीनदुबळ्या गोरगरिबांच्या विकासाचे काम हाती घेऊन लहान मुलांना शाळेत शिकण्यासाठी प्रवृत्त करणे, समाजाला न्याय व हक्क मिळवून देणे हे आपले कर्तव्य असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. यासाठी सर्वांनी तन-मन-धनाने सहकार्य करावे, असे आवाहन करत उपस्थितांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.







