पंढरपूर (तालुका.रिपोर्टर प्रकाश इंगोले) | पंढरपूर नगरपरिषदेमध्ये भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आणि देशाच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विशेष अभिवादन सोहळा पार पडला. लोकनियुक्त नगराध्यक्ष प्रणिता भगीरथ भालके यांनी दोन्ही महान नेत्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिल्या.
कार्यक्रमादरम्यान भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी देशाची एकता व अखंडता टिकवून ठेवण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिलेल्या अतुलनीय योगदानाचे उपस्थितांकडून विशेष स्मरण करण्यात आले. त्यांचे राष्ट्रसेवेतील विचार व कार्य सदैव प्रेरणादायी असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
तसेच, भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. देशाच्या जडणघडणीत आणि उभारणीत त्यांनी दिलेल्या मोलाच्या योगदानाचे व दृढ नेतृत्वाचे यावेळी स्मरण करण्यात आले.
या दोन्ही महान व्यक्तिमत्त्वांचे राष्ट्रसेवेतील कार्य, त्याग आणि देशाप्रती असलेली निष्ठा ही भावी पिढीसाठी सदैव प्रेरणादायी राहील, असा सूर याप्रसंगी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमात नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.







