फैजपूर (प्रतिनिधी हमीद तडवी) – भारतीय राज्यघटनेचे निर्माता शिल्पकार भारतरत्न महामानव प. पूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज सकाळी पावन स्मृतीस भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला फैजपुर शहरांमध्ये अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी फैजपुर शहराचे आ. एपीआय प्रकाश वानखेडे साहेब तसेच यावल तालुक्याचे तालुकाध्यक्ष तथा जि. परिषद सदस् आ. प्रभाकर जी अप्पा सोनवणे साहेब तसेच काँग्रेस अनुसूचित जाती महिला विभागाच्या जिल्हाध्यक्षा प्रतिभा ताई मोरे युवकांचे नेतृत्व अजय मेढे.यावल तालुक्याचे शहराध्यक्ष रियाज मेंबर जळगाव जिल्हा सरचिटणीस रामराव जी मोरे वसीमभाई,राष्ट्रवादीचे भालेराव सर काँग्रेस अनुसूचित जाती म. तालुका अध्यक्ष शबाना ताई तडवी विद्या भालेराव. संपूर्ण महिला पदाधिकारी यांनी उपस्थिती दिली.









