मुक्ताईनगर पोलिसांनी केला फेसबुकवरून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; नकली नोटा केल्या जप्त

cyber-thief
file photo

जळगाव (प्रतिनिधी तेजस भंगाळे) । देशभरातील नागरिकांना फेसबुक आणि इतर समाज माध्यमांवरुन एक लाख रुपयाचे मोबादल्यात दहा लाख रुपये देण्याचे आमिष देऊन लुटणाऱ्या गुन्हेगारांना अटक करुन त्यांच्या कडून नकली नोटां व इतर मुद्देमाल हस्तगत केले. Saawariya Set या फेसबुक प्रोफाईलवरुन एक २८ सेकंदांचा व्हिडीओ (रिल्स) प्रसारित करून. सदर व्हिडीओ मध्ये ” एक लाख का दस लाख मिलेंगा, जिसीको खरीदना है वही कॉल किजीए ” असे प्रलोभन देण्यात आले होते. दरम्यान या स्कॅममध्ये अनेक लोक फसल्याचेही आता समोर येत आहे. मात्र मुक्ताईनगर पोलिसांनी वेळीच या गुन्हेगारांना आळा घातला आहे.

आरोपीं विरूद्ध CCTNS NO. ४२०/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ६२, ३ (५) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (ड) या गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून आरोपी देवकुमार शिवराज भोसले व सुजिता उर्फ सुजाता शिवकुमार भोसले यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यातून पाचशेच्या एक हजार 65 नकली कागदी नोटा तसेच पाच अॅन्ड्राईड मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे. सदरची कारवाई डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधिक्षक सो. जळगांव, यांचा मार्गदर्शनात मुक्ताईनगर पोलिस निरीक्षक आशिष अडसूळ यांचा पथकाने ही कारवाई केली.
मुक्ताईनगर पोलीस ठाणे अंतर्गत कु-हा दुरक्षेत्रचे कार्यकक्षेतील मधापुरी, लालगोटा, हलखेडा, जोंधनखेडा, चारठाणा ता. मुक्ताईनगर अशा गावांत व परिरसरात वास्तव्यास असलेल्या काही गुन्हेगारवृत्तीच्या लोकांनी विविध समाजमाध्यमांवरुन एक लाख रुपयाचे मोबदल्यात १० लाख रुपये देण्याचे आर्थिक प्रलोभन / आमिष देणे, सोन्याचे नाणी / विटा देणे, काळी हळद देणे, रेड मर्क्युरी, उल्टी वासन, नागमणी देणे असे सामान्य लोकांना प्रलोभन देणारे व्हिडीओ प्रसारीत केले होते.
या प्रलोभनाला बळी पडलेल्या देशातील वेगवेगळ्या भागातील नागरिकांना नमूद भागात बोलावून त्यांना मारहाण करुन त्यांच्या कडील रोख रुपये व साहित्य लुटण्याचे प्रकार घडवून आणलेले आहेत. त्या बाबत मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात वेळोवेळी सदर भागातील वरील प्रमाणे कृत्य करणा-या लोकांचे विरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक, आशिष अडसूळ यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here