टीव्ही बघतो म्हणून रागावल्याने, १३ वर्षीय मुलाने घेतला गळफास

child-sucide

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – टीव्ही बघतो म्हणून सावत्र आई रागावल्याने १३ वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची घटना पुण्यातील चिखली येथे घडली. रमजान अब्दुल शेख (रा. जाधववाडी, चिखली) असे मुलाचे नाव आहे. या घटनेचा तपास चिखली पोलीस करत आहेत.

 

रमजान तासनतास टीव्हीवर कार्यक्रम बघत बसायचा. यावरून त्याची सावत्र आई त्याला रागावली. आई रागावली म्हणून मंगळवारी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास रमजानने ओढणीने गळफास घेतला. घरात बेशुद्धावस्थेत आढळल्यानंतर रमजानला त्याच्या घरच्यांनी तातडीने नजीकच्या रुग्णालयात नेले. त्याची प्रकृती अधिकच खालावली. त्याला पुढील उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिथे दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. तेथील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. या घटनेचा पुढील तपास चिखली पोलीस करत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here